Jump to content
फॉलो करें Whatsapp चैनल : बैल आईकॉन भी दबाएँ ×
JainSamaj.World

kishor randive

Members
  • Posts

    1
  • Joined

  • Last visited

 Content Type 

Profiles

Forums

Events

Jinvani

Articles

दस लक्षण पर्व ऑनलाइन महोत्सव

शांति पथ प्रदर्शन (जिनेंद्र वर्णी)

Downloads

Gallery

Blogs

Musicbox

Everything posted by kishor randive

  1. *भगवान महावीर मंदीर* :- तेरमधील हे भगवान महावीरांचे मंदीर म्हणजे जैन धर्मीयांसाठी एक महत्वाचे स्थान आहे. श्री १००८ भगवान महावीर आपल्या शिष्यासमवेत दक्षिण भारतात तेरमध्ये आले, त्यामुळे हे समवशरण असलेले पावन क्षेत्र आहे. तेरमधील या जैन बसदीचे बांधकाम इ.स. १३१३ मध्ये व जीर्णोध्दार १५२० मध्ये केल्याची माहिती येथील दोन शिलालेखावरुन मिळाल्याची माहिती इतिहासकार देतात. मंदीराच्या वास्तुघटकावरुन हे मंदीर इ.स. दुसर्या किंवा तिसर्या शतकातील असावे असे डॉ. शां.भा.देव मानतात. या मंदीरात सुंदर अशी पाषाणाची पद्मासनात स्थित असलेली, महावीरांची साडे पाच उंचीची पुर्वाभिमुख मुर्ती आहे. या मंदीरातील इतर मुर्तॉ निजामशाही व त्यापुर्वीच्या परकीय आक्रमणात नष्ट झाल्या.मात्र मुर्तीभंजक या भगवान महावीरांच्या मुर्तीपाशी आले कि त्यांचा मृत्यु व्हायचा अशी कथा प्रचलित आहे. या मुर्तीच्या मागे आदिनाथ भगवान व पार्श्वनाथ भगवान यांच्या मुर्ती प्रतिष्ठापित आहेत तर गाभार्याच्या प्रवेशद्वाराच्या दोन्ही बाजुला पार्श्वनाथ भगवंताच्या दोन मुर्ती आहेत. मंदिराच्या दरवाज्याच्या बाहेर श्री पार्श्वनाथ व श्री शांतीनाथ भगवान तर त्याच्याही बाहेर एका बाजुस पद्मावर्ती माता व दुसर्या बाजुला क्षेत्रपाल भगवान वास्तव्य करीत आहेत. मंदीराची रचना गर्भगृह , सभामंडप व सभोवताली दगडी भिंतीचा परकोट अशी आहे. या मंदीराशेजारी श्री १००८ पार्श्वनाथ स्वामी मंदीर असून त्यात पार्श्वनाथांची उभी मुर्ती आहे.तसेच शेजारी असलेल्या समवशरण मंदीरात १० तीर्थंकराच्या मुर्तीसह २४ तीर्थंकराच्या पादुका आहेत. मंदीराच्या बाहेर श्री आर्यनंद महाराज, श्री शांतीसागर महाराज यांचे चरणपादुका मंदीर आणि श्री १००८ सहस्त्रफणा सुपार्श्वनाथ भगवान मंदीर आहे. शेजारी जुनी विहीर असून पुर्वी पुजेची भांडी रात्री कागदावर लिहून चिठ्ठी पाण्यात सोडल्यास सकाळी हवी असलेली भांडी मिळत अशी आख्यायिका सांगितली जाते. या ठिकाणी प्रतिवर्षी माघ शुध्द पंचमी म्हणजेच वसंत पंचमीला यात्रा भरते. यासाठी विवीध ठिकाणावरुन जैन भाविक येथे येतात. याशिवाय तेर परिसरात काही प्रेक्षणीय स्थळे आहेत.त्यांची थोडक्यात ओळख करुन घेउया. तेरजवळ साडे सहा मैलाजवळ डकवाडी हे गाव आहे. इथे अगस्ती ऋषींचा आश्रम आहे.इथे अगस्ती ऋषी बसून ज्ञानदान करायचे. पुर्वी जेव्हा तिथे आश्रम नव्हता , तेव्हा दोन बेलाची झाडे उगवली. ती झाडे या ऋषींना सावली देण्यासाठी म्हणून नव्वद आणि साठ अंशात वाकली. तसेच आणखी एक हिंगळजवाडी म्हणून खेडे आहे.इथे हिंगुळ अंबीकेचे मंदीर आहे. या मंदीरासमोर रेखीव नंदी व शिवालय आहे. या मंदीरातील शिवपिंड हि शिल्पकलेचा नमुना आहे. हि पिंड अचल असून त्याची शाळूंका स्वतः भोवती गोल फिरु शकते. तसेच तेरजवळ भंडारवाडी नावाचे गाव आहे.इथे असलेल्या सिध्देश्वर मंदीरात शंकराच्या पिंडीला शांळुका नाही. त्याएवजी त्या जागी खड्डा आहे.त्या खड्ड्यात अखंड स्वरुपात पाणी असते. पावसाळ्यात या पाण्याची पातळी वाढत नाही किंवा प्रचंड उन्हाळ्यात ती कमी होत नाही. ते पाणी ओंजळीने काढून टाकले तरी चार-पाच तासात पुन्हा पहिल्यासारखी पातळी होते. तेर गावात जंगलेश्वर मंदीर आहे. त्याच्या शेजारी वडाचे झाड असून त्याची वाढ होत नाही.अगदी फांद्या आणि पारंब्याही तितक्याच रहातात. भारतातील सर्व शिवालयातील शिवलिंगाचे मुख उत्तरेकडे तोंड करुन असते. मात्र तेरमध्ये सर्व दिशांना मुख करुन शिवपिंड आहेत. त्रिविक्रम मंदीराजवळ असलेला मेंढेश्वर महादेव पुर्वेकडे मुख करुन आहे. तर कालेश्वर मंदीराजवळ असलेला नीळकंठेश्वर महादेव पश्चिमेकडे मुख केलेले आहे.व्यासांच्या शेताजवळ दक्षिणेश्वर नावाच्या मंदीराचे अवशेष सापडलेले आहेत. जैन धर्माचे चोवीसावे तीर्थंकर भगवान महावीर तेरमध्ये येउन गेले. त्यांचे समवशरण असलेले हे दक्षिण भारतातील एकमेव स्थान.
×
×
  • Create New...