पहीली माझी आरती कैलास गिरीला |
आदिनाथ भगवंताला करूया आरती |
दूसरी माझी आरती सम्मेद गिरीला |
बीसनाथ भगवंताला करूया आरती |
तिसरी माझी आरती चम्पापुरीला |
वासुपुज्या भगवंताला करूया आरती |
चौथी माझी आरती गीरणार गिरीला |
नेमिनाथ भगवंताला करूया आरती |
पांचवी माझी आरती पावपुरीला |
महावीर भगवंताला करूया आरती |
सहावी माझी आरती मांगीतुंगीला |
रामचंद्र भगवंताला करूया आरती |
सातवी माझी आरती श्रमणबेल गोलाला |
बाहुबली भगवंताला करूया आरती |
आठवी माझी आरती लासुर नगरील |
पार्श्वनाथक भगवंताला करूया आरती |
नेमिनाथ भगवंताला करूया आरती |