वीतराग जिन ! दीपार्चन हे,
मंगल तव चरणीं, अर्पण तव चरणीं ।
शांतीसुधेच्या मधुरा स्वादा ,
देते दिनरजनी ।। शांति ।। धृ. ।।
अगण्यगुणगण प्रभा जीवांच्या ,
नाशवी मोहात , ज्ञानामृत देते ।
सकल जीवातें शिवपुर - मार्गा ,
प्रेमे दर्शविते ।।
सकल जीवातें शिवपुर - मार्गा ,
प्रेमे दर्शविते ।। वीतराग जिन... ।।१।।
शुभ भावांची ज्योत तेवूनी ,
भक्तिरूपी घृत ते, भक्तिरूपी घृत ते।
ओतुनी प्रेमें करितां आरती
स्वगुणा प्रगटवितें ।।
ओतुनी प्रेमें करितां आरती
स्वगुणा प्रगटवितें ।। वीतराग जिन... ।।२।।